पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केल्याने भाषांतर - २

इमेज
केल्याने भाषांतर - १ च्या पुढे - हनुमानाची श्रीरामावर अतूट श्रद्धा असण्यामागे काय कारण होते? हनुमान वानरांमध्ये अतिशय बुद्धिमान, प्रामाणिक आणि बलशाली होता. त्यामुळे त्याच्या एवढा किंबहुना जास्त योग्य असा गुरु वा आदर्श त्याला त्याच्या बालपणी मिळाला नाही. रामायणात हनुमांचे दत्तक पिता केसरी यांचा क्वचित उल्लेख आढळतो. यावरून मारुतीला वडिलांचे फार मार्गदर्शन लाभले असे दिसत नाही. त्यामुळे आपल्या खर्या शक्तीची प्रचीती त्याला लहानपणी आली नसावी. युवा मारुतीला आधी वाली आणि नंतर सुग्रीवाचे मार्गदर्शन मिळाले असावे. पण या दोघांपैकी कुणीही अतिशय प्रामाणिक आणि नैतिक अशा मारुतीवर प्रभाव पाडू शकला असावा असे वाटत नाही. जेव्हा मारुती श्रीरामाला भेटला, त्याला आपण आयुष्यामध्ये काय शोधत होतो याची तत्क्षणी प्रचीती झाली. वानर जमातीला अयोध्येच्या साम्राज्याची कल्पना होती, पण या साम्राज्याचा सर्वेसर्वा इतका विनयशील असावा अशी त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. श्रीरामामध्ये असलेली  दया, मृदुता, प्रामाणिकता आणि शौर्य मारुतीला आधी कोणातही दिसले नव्हते. अशा जगामध्ये जिथे भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले होत

केल्याने भाषांतर - १

इमेज
भाषेचा मला आहे लळा. नाही म्हणजे १ वर्ष जर्मन, १ वर्ष रशियन, ६ महिने पोलिश, साधारण इयत्ता पाचवीपासून इंग्रजीवर वर्चस्वासाठी चाललेली झुंज, श्लोक स्पष्टपणे वाचता येती एवढे संकृत असा सगळा एकूण चिवडा झाला आहे. हिंदी वाल्यांना त्यांच्यात भाषेत गप्प करण्याएवढी हिंदी बरी आहे. एक तरी परकी भाषा अस्खलित बोलता यावी हे अजूनही ध्येय आहेच. बर्याचदा हॉलीवूड पिच्चर मध्ये कुणी जर्मन, रशियन किंवा पोलिश बोलले आणि त्यातले २-३ शब्द जरी कळले तर काय जाम भारी वाटते. किंवा घरामध्ये पूजा असताना संस्कृत श्लोक न अडखळता वाचल्यावर घरातले कौतुकाने बघतात तेव्हा जरा हुरूप येतो. संस्कृत आणि रशियन, पोलिश, जर्मन यांच्यातल्या साम्याविषयी ऐकून होतो. पण त्याची स्वतः प्रचीती जेव्हा घेतली तेव्हा जो आश्चर्यमिश्रीत आनंद झाला त्याला तोड नाही. ज्ञान पण चक्रवाढ व्याजाप्रमाणे असते म्हणे. म्हणजे अज्ञानही तसेच असणार. मग नक्की माझे ज्ञान वाढतंय की अज्ञान? असो.. मराठी माझी चांगली आहे. पण आता इंग्लिश चा एवढा शिरकाव झालाय की शुद्ध मराठी बोलले की लोक भुवया वर करतात. काहींना तर हसू आवरत नाही. लहानपणी माझी फार गोची व्हायची. शाळा भाव