पोस्ट्स

जून, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Mumbai Pune Mumbai Review

इमेज
आज मुंबई पुणे मुंबई पाहिला. दशकांपासून पुणे मुंबईचे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अस्सं काही नातं आहे. या पिक्चर मध्ये पुण्याचा 'स्वाभिमान' आहे आणि मुंबई चा 'तिखटपणा' आहे, पण कुठेही उपदेश देण्याचा प्रयत्न नाही, फ़क़्त या नात्याच्या आनंदाची उधळण आहे. त्यामुळे अवघा ९० मिनिटांचा हा सिनेमा भाव खाऊन जातो. स्वप्नील जोशी तुफान.. मुक्त बर्वे खरच "भारी" दिसते.. खूप हसलो..कर्कश्श पार्श्वसंगीत सोडून सगळे गोड गोड. विषयात जाम पोटेन्शिअल आहे अजून, दुसरा पार्ट आला तर मजा येईल.. :D नक्की बघा.. Alka - 2.30PM, Nilayam - 3.30PM, Mangala - 2.30PM and in other multiplexes.

Rajneeti Review

इमेज
राजनीति बघितला.. मोठ्ठा कॅनवास, बांधीव पटकथा, उत्तम अभिनय. महाभारताचे आधुनिक रूप दाखवणे हे किती अवघड आहे, पण जमलय. प्रकाश झांचे सिनेमे भारीच असतात, इथे त्यांनी फुल जीव ओतलाय. निर्मितीमूल्य उच्च म्हणजे नावं ठेवायला जागा नाही इतकी उच्च आहेत. मला सर्वात जास्त काय आवडले असेल तर sound mixing.. लैच भारी आहे. तीन तास बसणे थोडे जीवावर येते. पुढाऱ्यांपेक्षा कोणीच मोठे नाही आणि पोलीस आणि न्यायव्यवस्था त्यांच्या हातचे खेळणे आहेत, हे मात्र बोचते..(ही उणीव काढण्यासाठी गंगाजल बघा, अशी साईडनोट टाकायला हवी, नाहीतर लै डिप्रेसिंग वाटू शकते). मला बऱ्याच जणांकडून निगेटीव कॉमेंट्स आल्या होत्या या पिक्चर बद्दल, पण हा सिनेमा नक्कीच वाईट नाहीये. तीन तास असतील घालवायला, आणि सिरीअस विषय कठीण नसतील पचवायला (यमक जुळवले :D) , तर जा बिंधास्त बघा..